उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेजचा बारावीचा निकाल 84.88%

0

केम (संजय जाधव) : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित श्री उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेज, केम या महाविद्यालयाचा बारावीचा निकाल यंदा 84.88% लागला आहे.

या महाविद्यालयाततुन बारावी परीक्षेस एकूण 86 विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी 73 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष प्राविण्य मिळवलेल्यांची संख्या 3 आहे. प्रथम श्रेणी मिळवलेले 34 विद्यार्थी आहेत, द्वितीय श्रेणीतील विद्यार्थी 29 आणि तृतीय श्रेणीतील 7 विद्यार्थी आहेत.


विद्यार्थ्यांचे क्रमवारीनुसार निकाल:

प्रथम क्रमांक : कु. सानिया खुद्बुद्दीन पठाण — 87.55%

द्वितीय क्रमांक : कु. राजनंदिनी बाळकृष्ण जगताप — 80.33%

तृतीय क्रमांक : कु. विद्या रामा कांबळे — 75.67%

चतुर्थ क्रमांक : कु. तळेकर ईश्वरी महादेव — 74.67%

पाचवा क्रमांक : कु. तळेकर चंदना राजाराम — 74.33%


प्राचार्य श्री एम. डी. बेले, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, प्राध्यापक वर्ग, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व केम पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

सुलेखन– प्रशांत खोलासे, केडगाव(ता.करमाळा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!