जगताप विद्यालयाला कात्रेला परिवाराकडून ५१ हजारांची मदत
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – झरे येथील नामदेवराव जगताप माध्यमिक विद्यालयाला २६ जानेवारीला करमाळा येथील कात्रेला परिवाराकडून ५१ हजारांची मदत करण्यात आली.
नामदेवराव जगताप माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला. ध्वजारोहन करमाळा येथील पुनम जनरल स्टोअरचे मालक कांतीलाल प्रेमचंद कात्रेला यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यालयाची गुणवत्ता यावर समाधान व्यक्त करीत त्यांनी विकास कामाला 51 हजाराची स्वर्गीय बदाम बाई कांतीलाल कात्रेला यांच्या स्मृतिपित्यर्थ शाळेला देणगी दिली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष वृंदावन निवासी कदंब कृष्ण प्रभू महाराज हे होते. त्यांनी विद्यार्थ्यांना, शिक्षकांना सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी आवाहन केले. विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले. यावेळी राधेश्याम मंगल कार्यालयाचे मालक भाऊसाहेब जाधव, शुभम सुशीलकुमार कात्रेला, ओंकार चांदगुडे सरपंच श्री शिवाजी आबा पिसाळ तंटामुक्ती अध्यक्ष श्री किसन तात्या घाडगे व संस्था अध्यक्ष श्री बन्सी आबा घाडगे यांच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी ग्रामस्थ आजी-माजी विद्यार्थ्यांचे उपस्थितीत कार्यक्रम सादर झाला.