जिल्हा नियोजन समितीतुन करमाळा तालुक्यातील ९ रस्त्यांसाठी ८५ लाख रुपये मंजूर – गणेश चिवटे

0

करमाळा (संदेश प्रतिनिधी)  सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून करमाळा तालुक्यातील ९ रस्त्यांसाठी ८५ लाख रु निधी मिळाला असल्याची सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गणेश चिवटे यांनी प्रसार माध्यमांना दिली.

याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की,सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील व माढा लोकसभा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजन मधून नुकताच धायखिंडी-करंजे रस्त्यासाठी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. या नंतर लगेच आता करमाळा तालुक्यातील ९ रस्त्यांसाठी ८५ लाख रु निधी मिळाला मिळाला आहे.यात पुढील रस्त्यांचा समावेश आहे –

  • विट येथील गावडे वस्ती रस्ता १० लाख रु.
  • कुंभेज येथील भोसले वस्ती रस्ता १० लाख रु,
  • हिसरे- सालसे (२) रस्ते २० लाख रु,
  • बिटरगाव श्री येथील भोसले वस्ती बंधारा रस्ता १० लाख रु,
  • पोथरे येथील पोटेगाव रस्ता १० लाख रु
  • बोरगाव रस्ता ५ लाख रु,
  • मिरगव्हाण येथील जुने गावठाण ते पाटील वस्ती रस्ता १० लाख रु,
  • देवळाली येथील बादाळे वस्ती रस्ता १० लाख रु.

वरील नमूद केलेले रस्ते वर्षानुवर्षे नादुरुस्त होते.खुप खराब असल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना व नागरिकांना दळणवळणासाठी खूप अडचणी निर्माण होत होत्या आता या समस्या दूर होणार असल्याचे श्री चिवटे यांनी सांगितले. यानंतर  या भागातील लोकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!