करमाळ्यातील 'स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूल'चे स्नेहसंमेलन उत्साहात.. - Saptahik Sandesh

करमाळ्यातील ‘स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूल’चे स्नेहसंमेलन उत्साहात..


करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूल करमाळा शाळेचे स्नेहसंमेलन अविष्कार २०२३-२०२४ मोठ्या उत्सवात संपन्न झाला, करमाळा शहरातील तसेच ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबातील चिमुकले कलाकार देशभक्ती, पारंपारिक गीते, लोकगीते, मराठी – हिंदी चित्रपट गीते यावर बहारदार नृत्याविष्कार सादर केला.

या कार्यक्रमाप्रसंगी प्रथम सरस्वती, जिजाऊ, स्वामी विवेकानंद, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, उद्घाटन आमदार संजयमामा शिंदे यांचे हस्ते झाले तर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणुन पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे, जिल्हा प्रमुख शिवसेना पंढरपूर विभाग महेश चिवटे, ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष ॲड.डॉ.बाबुराव हिरडे, भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, उध्दवदादा माळी, संस्थेचे मार्गदर्शक रामचंद्र दळवी, विवेक येवले, एकलव्य शाळेचे अध्यक्ष रामकृष्ण माने, अँड अजित विघ्ने, अंजली श्रीवास्तव, डॉ ब्रिजेश बारकुंड, डॉ रोहन जाधव पाटील, कमलाकर वीर, कमलाई नगरी साप्ताहिकचे संपादक तथा स्नेहालय स्कूलचे संस्थापक अध्यक्ष जयंत दळवी, मुख्याध्यापिका – सचिव धनश्री जयंत दळवी संस्थेच्या मार्गदर्शिका सौ सुमन दळवी, मंजुळा वाघमारे, सुलोचना दळवी, व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी पत्रकार नाशिर कबीर, अशोक मुरूमकर, किशोरकुमार शिंदे, अश्पाक सय्यद, नागेश चिंडगे, विशाल परदेशी, दस्तगीर मुजावर,मा नगरसेवक नारायण पवार, अण्णा सुपनवर, आदिनाथचे व्हा चेअरमन रमेश कांबळे, युवा नेते अजिंक्य पाटील, भाजपचे बाळासाहेब कुंभार, तसेच विद्यार्थी, विद्यार्थिनी पालक, करमाळा तालुका पत्रकार संघ, राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


या कार्यक्रमासाठी परिश्रम शाळेच्या शिक्षिका शिंवागी कांबळे, शुभांगी खळदकर,अश्विनी महामुनी, अश्विनी पाटील, रुपाली जगताप, त्रिवेणी शिंदे, रोहिणी गरड, सविता पवार, अंजुम कांबळे, कृष्णा पवार, राहुल पलंगे यांनी केले होते. मनोगत अंजली श्रीवास्तव,विविक येवले, डॉ ब्रिजेश बारकुंड, रामकृष्ण माने यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकुमार वलटे सर यांनी तर प्रास्ताविक मुख्याध्यापक सचिव धनश्री दळवी यांनी तर आभार संस्थापक अध्यक्ष जयंत दळवी यांनी मानले आहे.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्कूलमध्ये सातत्याने नवीन उपक्रम राबविले जातात, विद्यार्थ्यांचे कला, कौशल्याला वाव देण्यासाठी स्नेहसंमेलन हे महत्वाचे असून, यापुढील काळातही विद्यार्थी विकासासाठी वेगवेगळे उपक्रम आयोजित करु. – धनश्री दळवी, मुख्याध्यापिका

स्नेहालयच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. गुणवत्ता वाढविण्यावर भर देतानाच सहशालेय उपक्रम राबविले जात आहेत. त्यासाठी पालक वर्ग देत असलेली साथ महत्वाची आहे. विद्यार्थ्यांना अधिकाधिक चांगले शिक्षण देत त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला वाव देण्याकडे सतत लक्ष दिले जाईल. जयंत दळवी, संस्थाध्यक्ष

स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चालना देण्यासाठी प्रयत्न केला आहे, यामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो. या स्कूलने आणखी असेच विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळेल असेच कार्यक्रम राबवावेत. – ज्योतीराम गुंजवटे, पोलीस निरीक्षक

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!