मांगी येथून १५ वर्षाच्या मुलीस पळवले..
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता. ९ : मांगी (ता. करमाळा) येथील १५ वर्षाच्या मुलीस अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेले आहे. अशी फिर्याद या मुलीच्या आईने पोलीसात दिली आहे.या फिर्यादीत तिने म्हटले की, ५ मे २०२३ रोजी मी दुपारी घरी असताना माझी १५ वर्षाची मुलगी गावातून बाजार आणते म्हणून गेली ती परत आली नाही. तीचा शोध घेऊनही ती सापडली नाही. त्यामुळे तीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून फूस लावून पळवून नेले आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण साने हे करत आहेत.