अंगावर वीज कोसळल्याने गुळसडी येथील ४५ वर्षाच्या महिलेचे निधन
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – गुळसडी (ता.करमाळा) येथील कमल सुभाष अडसुळ (वय ४५) यांचा आज (दि.४) अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, तीन विवाहित मुली आदी परिवार आहे.
यात हकीकत अशी की, कमल या पती सुभाष व मुलगा ज्ञानेश्वर यांच्या बरोबर स्वतः च्या शेतात काम करत होत्या. पावसाचे वातावरण झाले होते. वीजा चमकत होत्या. त्यामुळे सर्व घरी निघाले होते. मुलगा व पती बैलगाडीत बसले व त्या पायी चालत होत्या. अचानक वीज त्यांच्या अंगावर कोसळली व त्यात त्या भाजल्या गेल्या. या घटनेनंतर पतीने त्यांना करमाळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले परंतु उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले. यानंतर गुळसडी गावात शोककळा पसरली.