पंचायत समितीच्या माजी सदस्य व साडेच्या सरपंच जयाबाई जाधव यांच्यासह ग्रामसेवकावर अपहरणाचा गुन्हा दाखल - Saptahik Sandesh

पंचायत समितीच्या माजी सदस्य व साडेच्या सरपंच जयाबाई जाधव यांच्यासह ग्रामसेवकावर अपहरणाचा गुन्हा दाखल

करमाळा (संदेश प्रतिनिधी) : पंचायत समितीच्या माजी सदस्य व साडेच्या सरपंच जयाबाई दत्तात्रय जाधव यांच्यासह ग्रामसेवक राजेश फरतडे यांच्यावर ग्रामपंचायतीच्या 7142395 रूपयेचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी मनोजकुमार देविदास म्हेत्रे यांनी फिर्याद दिली आहे.

त्यात त्यांनी म्हटले की, माझेकडे वांगी आणि केम या दोन प्रभागातील सुमारे 35 ग्रामपंचायतीचा अधिभार आहे. त्यात मौजे साडे ही ग्रामपंचायत येते. 14 व्या वित्त आयोगातुन मौजे साडे ग्रामपंचायतीस सन 2015-2016 ते 2018-2019 या कालावधीत रक्कम रूपये 95,99,102 ₹ विकास कामासाठी अनुदान वितरित केलेले आहे. सदर अनुदान रकमेवर रूपये 76848 ₹ इतके बँक व्याज जमा झाले आहे. अशी एकुण रक्कम रूपये 96,75,950 ₹ जमा झालेली आहे.

सदर निधी प्राप्त झालेनंतर, शासन मार्गदर्शक सुचनांनुसार रितसर ग्रामसभेव्दारे हाती घ्यावयाच्या कामाचा कृती आराखडा तयार करून प्राधान्यक्रमाने त्याचे रितसर अंदाजपत्रक त्या त्या विभागाचे उपअभियंता यांनी करून त्यास तांत्रिक मान्यता मिळालेनंतर रितसर ग्रामपंचायतीची प्रशासकीय मान्यता घेवून त्याच्या 3 लक्ष किंमतीच्या कामासाठी व 50 हजारापेक्षा जादा किंमतीच्या साहित्य खरेदीच्या कामासाठी ई-निविदा करून झालेले कामाच्या मुल्यांकनाप्रमाणे रितसर रॉयल्टी आयकर विक्रीकर (GST) वजावट करून निव्वळ देय रक्कम संबधितांस रेखांकीत धनादेशाव्दारे / RTGS वित्त प्रणालीव्दारे अदा करणे व महाराष्ट्र लेखा संहिता 2011 नुसार त्याचे अद्यवात लेखे ठेवणे अभिप्रेत आहे.

शासनाने ग्रामपंचयातीस विकास कामांसाठी अदा केलेली कोणतेही रक्कम ही संबधितांना देण्यापुर्वी पुर्ण झालेल्या कामाचे मुल्यांकन व कामाचे फोटो गटविकास अधिकारी पंचायत समिती करमाळा यांना सादर करून त्यांची पुर्व परवानगी घेवूनच बँक खात्यातुन पैसे काढणे अभिप्रेत असते
परंतु मौजे साडे ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच जयाबाई दत्तात्रय जाधव, रा. साडे व तत्कालीन ग्रामसेवक राजेश सौदागर फरतडे (निलंबीत) सध्या मुख्यालय पंचायत समिती सांगोला यांनी वरील कार्यपध्दतीचा अवलंब न करता मौजे साडे ता. करमाळा ग्रामपंचायतीचे 14 व्या वित्त आयोग योजनेचे पैसे आय.डी.बी.आय. बँक शाखा करमाळा, येथून पुर्वपरवानगी न घेता, 71, 42,395.50 रूपये परस्पर चेकव्दारे काढुन त्या रकमेचा संगणमताने अपहार केला आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!