करमाळ्यात भरदिवसा १४ लाख रुपये असलेली बॅग चोरट्याने पळविली – करंजे येथील शरद पवार विरूध्द गुन्हा दाखल
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : चहा पिण्यासाठी बोलत बसले असताना करमाळा बसस्थानकावर उभा असलेल्या कार गाडीतून १४ लाख रुपये असलेली बॅग एका व्यक्तीने पळवून नेली आहे, हा प्रकार २७ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीन वाजता घडला आहे.
याप्रकरणी सुशील कांतीलाल कात्रेला यांनी करमाळा पोलिसात फिर्यादी असून त्यात त्यांनी म्हटले की, मी व माझा मित्र सचिन पांढरे असे दोघे मिळुन त्याच्याकडील इरटिका कार क्र एम एच 13 बी एन 4138 यामध्ये चहा पिण्यासाठी बोलत बसलो असताना माझ्या ओळखीचा शरद पवार (रा.करंजे ता.करमाळा) याने माझ्या ताब्यातील रोख रक्कम 14,00,000/- (चौदा लाख रुपये) ठेवलेली बॅग ही माझ्या संमती वाचुन, मुद्दाम,लबाडीने चोरुन घेवुन गेला आहे.
याप्रकरणी करमाळा पोलिसांनी शरद पवार (रा.करंजे ता.करमाळा) याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री.गुंजवटे यांचे आदेशाने पोहेकॉ. उबाळे यांचेकडे दिला आहे.