20 वर्षीय विवाहितेचा विनयभंग - तरुणावर गुन्हा दाखल.. - Saptahik Sandesh

20 वर्षीय विवाहितेचा विनयभंग – तरुणावर गुन्हा दाखल..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा (ता.६) : भिलारवाडी (ता.करमाळा) येथील 20 वर्षीय विवाहितेचा एका तरुणाने विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे, हा प्रकार 5 जानेवारी दुपारी 12:15 वा. सुमारास घडला आहे, याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी 20 वर्षीय विवाहितेने करमाळा पोलिसात फिर्यादी असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, भिलारवाडी येथील आमच्या घरी 5 जानेवारी रोजी दुपारी 12:15 वाचे सुमारास मी एकटीच होते. माझे पती व सासु हे मोलमजुरीचे कामा करता गेले होते, व मुलगा हा शाळेत गेलेला होता. मी घरी एकटी असतांना आमच्या घराशेजारी राहणारा 29 वर्षांचा तरुण मी काम करीत असलेल्या घरात आला व मला म्हणाला की, तुमचे घरची मंडळी कोठे गेली आहेत असे विचारले मी त्यास सागितले की, ते कामा करता गेले आहेत, काय काम आहे असे विचारताच, त्याने माझा हात धरला व मला म्हणाला की, तु मला खुप आवडतेस असे म्हणुन त्यांने माझा विनयभंग केला.

त्यांनतर मी जोराजोराने ओरडले असता, आमचे घराशेजारी राहणारे माझा आवाज ऐकुन पळत आले. तेवढयात माझे ओरडणेचे आवाजाने हा तरुण तेथुन पळत निघुन गेला जाताना त्याने मला धमकी दिली की, जर कोणास काही सांगितले तर तुला व तुझे घरच्यांना मारून टाकेल असे म्हणुन शिवीगाळ करीत तो तेथुन पळुन निघुन गेला. त्यानंतर माझे ओरडण्याचे आवाजाने माझे मदती करता आलेले शेजारी यांनी मला काय झाले ? असे विचारताच मी त्यांना सर्व घडला प्रकार सागितला असता, त्यांनी माझे पती यांना सदरचा प्रकार सांगितला. या प्रकरणी करमाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!