कल्याण मटका घेणाऱ्याविरूध्द करमाळ्यात गुन्हा दाखल..
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : करमाळा शहरात गायकवाड चौकात कल्याण मटका घेणाऱ्याविरूध्द पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १० नोव्हेंबरला सायंकाळी पावणेचार वाजता घडला आहे.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अतुल सर्जेराव लवळे यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की करमाळा शहरातील गायकवाड चौकात एकजण कल्याण मटका घेत असल्याची माहिती समजल्यावर आम्ही तेथे छापा टाकला असता, तेथे रज्जाक गफूर फकीर (वय ६०, मानेवस्ती, पुणे रोड) हा कल्याण मटका घेत असताना आढळून आला. त्याचेकडे रोख रक्कम ४१० रू., आकडेमोड केलेली लहान डायरी व निळ्या शाईचा बॉलपेन सापडलेला आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.