आळजापूर शाळेचा आदर्श उपक्रम - ७०४०० रू.च्या सायकलीची उभा केली बँक - Saptahik Sandesh

आळजापूर शाळेचा आदर्श उपक्रम – ७०४०० रू.च्या सायकलीची उभा केली बँक

करमाळा / संदेश प्रतिनिधी

करमाळा : आळजापूर येथील जिल्हापरिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक लहू चव्हाण व त्यांचे सहकाऱ्यांनी अतिशय चांगला उपक्रम राबविला असून, लोकवर्गणीतून ७०४०० रू. किंमतीच्या १६ सायकली घेऊन सायकल बँक उभारली आहे. या सायकलीचे वितरण नुकतेच गटविकास अधिकारी मनोज राऊत, गटशिक्षणाधिकारी राजकुमार पाटील, विस्तार अधिकारी जयवंत नलवडे व धर्मवीर प्रतिष्ठानचे संस्थापक संजय घोलप यांचे हस्ते वितरीत करण्यात आले.

आळजापूर येथील शिक्षणप्रेमी पालक व ग्रामस्थ यांचे वतीने वस्तीवरून पायी चालत येणाऱ्या पाचवी ते सातवी शिकणाऱ्या मुलींसाठी १६ सायकली खरेदी करण्यात आलेल्या आहेत. यासाठी अशोक फाऊंडेशनचे राजेंद्र रोडे, डॉ. गौतम रोडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश गपाट, उपाध्यक्ष दत्तात्रय टेंबाळे, सदस्य रघुनाथ रोडे, युवराज गपाट, दादासाहेब रोडे, दादासाहेब नवले, स्वत: मुख्याध्यापक लहू चव्हाण, चेतन किंगर, माजी जि. प. सदस्या राणी वारे, अभिमन्यु काळे यांनी या सायकलीसाठी देणगी दिली.

सायकल प्रदान करताना आळजापूरच्या सरपंच मनिषा घोडके, प्रतिनिधी रविकांत घोडके, दत्तात्रय घोडके, ग्रा.पं. सदस्या पार्वती रोडे, कैलास रोडे, महादेव गायकवाड, विनोद नवले, विलास गायकवाड, लक्ष्मण वाघमोडे, दादासाहेब रोडे, विश्वंभर रोडे, बाळू गायकवाड, पापासाहेब काळे, दस्तगीर शेख, भरत रोडे यांचेसह शिक्षणप्रेमी पालक उपस्थित होते.

सुत्रसंचालन सहशिक्षिका सानप मॅडम यांनी केले. उपस्थितांचे स्वागत विद्या निगुडे यांनी केले. प्रास्ताविक गुंजाळ मॅडम यांनी केले. आभार मुख्याध्यापक लहू चव्हाण मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!