शेटफळ येथे 'महिलांची शेती शाळेचे' आयोजन.. - Saptahik Sandesh

शेटफळ येथे ‘महिलांची शेती शाळेचे’ आयोजन..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : शेटफळ (ता.करमाळा) येथील महिला शेतकऱ्यांच्या शेती शाळेत हरभरा पिकाविषयी मार्गदर्शन करण्यात आले. कृषी विकासामध्ये महिलांचा सहभाग वाढण्यासाठी व कृषी विभागाच्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली शेटफळ तालुका करमाळा येथे फक्त महिलांची शेती शाळा आयोजित करण्यात आली होती.

यामध्ये कृषी विभागाच्या वतीने रब्बी हंगामासाठी हरभरा बियाणे सवलतीच्या दरात उपलब्ध करण्यात आले असून हरभरा पिकाच्या लागवड ते काढणे पश्चात तंत्रज्ञान नियोजन व शेतमाल प्रक्रिया उद्योग याविषयी कृषी विभागाच्या सुप्रिया शेलार यांनी उपस्थित महिलांना माहिती दिली.

यावेळी महिलांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या जिजाऊ शेतकरी गटाचे अध्यक्ष हर्षाली नाईक नवरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर मंदाकिनी साळुंखे यांनी आभार मानणे मानले यावेळी शासनाच्या कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती उपस्थित महिलांना देण्यात आली यावेळी शेतीमाल प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर देण्यात येणाऱ्या सवलती याविषयी शेती शाळेत महीती देऊन या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन शेतकरी गटातील महीलांना करण्यात आले.

यावेळी निता पोळ,गंगा लबडे,शोभा पोळ, सुषमा पोळ,सुमन पोळ,प्रतिभा पोळ , हर्षाली नाईकनवरे, मंदाकिनी साळूंके,उमा पोळ सारिका पोळ स्वाती लबडे सोनाली नाईकनवरे मंगल जाधव, ऋणिता नाईकनवरे, छंदा उंबरे शारदा पोळ,संध्या उंबरे, यांच्यासह गावातील महीला उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!