उमरड येथे दारू विक्रेत्या महिलेवर गुन्हा दाखल

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : उमरड येथे हातभट्टी दारू विक्री करताना एक महिला आढळली असून तिच्याकडे ८०० रूपयाची दारू सापडली आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रोहिदास शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले, की मौजे उमरड येथे स्वतःच्या घराच्या बाजुला मीरा तुकारा काळे ही महिला प्लॅस्टीक कॅन्ड मध्ये हातभट्टी दारू विक्री करताना आढळून आली. तिच्याकडे ८०० रूपयाची १० लिटर हातभट्टी दारू सापडली आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

