‘शिवविचार प्रतिष्ठान’चा ‘सामाजिक पुरस्कार’ डॉ.ॲड.बाबूराव हिरडे यांना प्रदान
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : टेंभुर्णी (ता.माढा) येथील “शिवविचार प्रतिष्ठानच्या” प्रथम वर्धापन दिनानिमित्त दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले, या मेळाव्यात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पाच जणांना पुरस्काराचे वितरण करण्यात आले, यामध्ये करमाळा तालुक्यातील ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष डॉ.ॲड.बाबुराव हिरडे यांना आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते “सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय काम केल्याबद्दल पुरस्कार” प्रदान करण्यात आला.
या पुरस्काराचे वितरण काल (ता.5) सायंकाळी ६ वाजता टेंभुर्णी येथे करण्यात आले. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून पंढरपूर-माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनदादा शिंदे हे उपस्थित होते तर यावेळी पुरस्काराचे वितरण आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विठ्ठलराव शिंदे महाविद्यालयाचे प्राध्यापक महेंद्र कदम व शिवव्याख्याते हर्षल बागल हे उपस्थित होते.
याप्रसंगी मावळा ग्रुप कुर्डूवाडी यांचा महिला दांडिया तसेच पालवण येथील संजोबा लेझीम संघ तसेच बबनराव शिंदे प्रशाला अकोले बुद्रुक यांचे लेझीम पथक मुलींचा तसेच बबनराव शिंदे प्रशाला अकोले यांचा तलवारबाजी मुलांचा असे विविध कार्यक्रम घेण्यात आले. याप्रसंगी शिव विचार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विजय बापू खटके पाटील यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत व आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे संयोजन गणेश व्यवहारे, गणेश शिंदे, सचिन पवार, योगेश खराडे पाटील, अजय जाधव, पाटलू भाऊ खटके, हनुमंत ढवळे, सागर कटके यांनी केले.
याप्रसंगी जिजाऊ सामाजिक पुरस्कार सौ स्मिता पाटील यांना तसेच सामाजिक पुरस्कार डॉ.ॲड.बाबूराव हिरडे तसेच साहित्यिक पुरस्कार प्राध्यापक संजय साठे यांना तसेच कृषी भूषण पुरस्कार सोमनाथ हुलगे तर व्यसनमुक्त पुरस्कार श्री बाळासाहेब माने यांना देण्यात आला.