मराठी माणसाची निराशा करणारे ठरले दोन्ही दसरा मेळावे
मा. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी 19 जानेवारी 1966 ला शिवसेनेची स्थापना केली. शिवसेनेची धोरणे, संघटन कौशल्य पुढील योजना समस्त मराठी माणसाला सांगण्यासाठी 30 ऑक्टोबर 1966 ला शिवतीर्थावर म्हणजेच शिवाजी पार्क मैदानावर जाहीर सभा मेळावे याडोवजी शिलांगणाचे सोने लुटण्याचं नियंत्रण मराठी माणसाला बाळासाहेब ठाकरेंनी दिले.
अस वाचनात आले की, शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्याला वर्तमानपत्रांनी या मुळीच प्रसिद्धी वगैरे दिली नव्हती. पहिल्या दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेचे धोरण सांगताना म्हणाले होते की, “आज महाराष्ट्राला राजकारणापेक्षा समाजकारणाची गरज आहे. त्यामुळे शिवसेना ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण करणार असल्याचे सांगितले”.
आज महाराष्ट्रातील राजकारणाचा केंद्रबिंदूच शिवसेना बनली आहे. बाळासाहेबांसोबत काम केलेले लोक शिवसेना सोडून गेले. त्याच पहिल्या दसरा मेळाव्यात प्रबोधनकार ठाकरे यांनीही भाषण केले होते. ते म्हणाले इतके दिवस ‘बाळ’ हा ठाकरे कुटुंबियाचा होता. आज हा ‘बाळ’ मी तुम्हाला दिला. म्हणजे मराठी माणसाला, महाराष्ट्राला दिला. सध्या शिवसेना कोणाची यावरून गेली कित्येक दिवस झाले वाद चालू आहे. याच वादातून शिवसेना दोन भागात विभागली त्यातुन शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट निर्माण झाले. मूळ शिवसेना कोणाची ? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पण शिवसेना आमचीच म्हणू लागले.
यावर्षी महाराष्ट्रात शिवसेनेचे दोन दसरा मेळावे झाले. एक शिवाजी पार्क आणि दुसरा BKC मैदानावर. दोन्ही ठिकाणी आपआपल्या गटाचे जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. टिका टिप्पणी झाल्या.
परंतु महाराष्ट्राला जे पाहिजे ते कोणीही बोलल नाही. महाराष्ट्राला काय कमी आहे? कशाची गरज आहे? कोरोना सारखे रोग परत येवू नये म्हणून काय केल पाहिजे? जर आलीच रोगराई तर काय उपाय योजना तयार आहेत? सध्या कोरोना मुळे जगाचे नुकसान झालेले कस करून काढता येईल. पुढील शैक्षणिक, क्रिडा धोरण काय असेल? कोणीच सांगितल नाही.
दोन्ही बाजूने हिंदूत्वावर जोरदार आरोप प्रत्यारोप झाले. परंतु सध्या फक्त हिंदूत्व करून चालणार नाही. महाराष्ट्रात जास्तीत जास्त रोजगार निर्माण करून बेरोजगारी कशी कमी करता येईल, शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न कसे मिळवून देता येईल, ग्रामीण भागांचा विकास करून शहरी भागात होणारे स्थलांतर कसे कमी करता येईल, सर्वसामान्यांना कमी पैशात शिक्षण कसे देता येईल या गोष्टीवर कोणीही बोलले नाही.
सरकारने महाराष्ट्रात जनगणनेसारखी प्रक्रिया राबवून गरजवंत कोण, गरीब कोण, श्रीमंत कोण याची गणना करून गरजवंताला मदत देणे गरजेचे आहे.
बाळासाहेबांनी ज्या विचारांनी दसरा मेळाव्याची सुरुवात केली होती तो विचार कुठे तरी मागे पडत चाललाय अस वाटत.प्रक्रिया राबवून गरवंत कोण, गरीब कोण, श्रीमंत कोण यांची गणना केली पाहिजे. गरजवंताला मदत गेली पाहिजे. यासाठी काही तरी केले पाहिजे.
मराठी माणसावर होणाऱ्या अन्याया विरुद्धात आवाज उठविण्यासाठी सुरू केलेल्या मेळाव्यात मराठी माणसाच्या प्रगती बद्दल दोन्ही बाजूने कोणी एक अक्षरही कुणी बोलले नाही.
थोडक्यात काय तर हा मेळावा फक्त एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप व शक्तीप्रदर्शन करण्यातच पार पाडला व मराठी माणसाची निराशा झाली.
✍️ तुषार तळेकर, केम (ता. करमाळा) मो.9405203897