केम येथील शेतकऱ्याने केला स्ट्रॉबेरी लागवडीचा यशस्वी प्रयोग - Saptahik Sandesh

केम येथील शेतकऱ्याने केला स्ट्रॉबेरी लागवडीचा यशस्वी प्रयोग

केम (संजय जाधव) – महाराष्ट्रात वाई, महाबळेश्वर यासारख्या थंड हवेच्या वातावरणात वाढणाऱ्या स्ट्रॉबेरीची शेती केम (ता.करमाळा) सारख्या भागात लावून त्याचा यशस्वी प्रयोग येथील शेतकरी, कृषी पदवीधर नागनाथ हरिदास तळेकर यांनी केला आहे.

त्यांनी आपल्या शेतात एक एकरावर स्ट्रॉबेरी फळांची लागवड केली आहे.केम व परिसरातील प्रमुख द्राक्ष, डाळींब,केळी, पेरू, सीताफळ या सारख्या फळपिकांची लागवड झालेली आहे. काही शेतकरी जिद्द व मेहनतीच्या जीवांवर उत्कृष्ट उत्पादन घेत असल्याचे आढळून येत आहे
अशा परिस्थिती त कृषी पदवीधर झालेल्या नागनाथ तळेकर यांनी आपल्या भागात नवीन काय तरी करायचे उद्देशाने त्यांनी आपल्या शेतात एक एकरावर स्ट्रॉबेरी ची लागवड केली. याला कृषी सहायक चौधरी यांनी या रोपाविषयी मार्गदर्शन केले.

तळेकर यांनी वाई येथून क्यिंटर डाउन या जातीची स्ट्रॉबेरी ची रोपे आणली या पिकांचे लागवडीतील अंतर चार बाय एवढे असून याला माध्यम स्वरूपाची जमीन आवश्यक असते तसेच लागवडी पूवीं खताचा बेसळ डोस वापरून त्यावर मल्चिंग ड्रीप अंथरले या पिकाला थंड हवामानाची गरज असून साधारणतः डिसेंबर महिन्यात याची तोडणी येइल या हिशेबाने याची लागवड केली जाते. तसेच या पिकासाठी एकरी दिड लाख एवढा खर्च आला असून विद्राव्य खते तसेच काहि औषध फवारणी याचा खर्च मिळून जवळपास ५० हजार खर्च आला आहे. तापमान कमी करण्यासाठी स्प्रिंकलरचा वापर तसेच प्लॉटच्या सर्व बाजूंनी जुन्या साडयां चा वापर करून कुंपण केले आहे. या साठी कुशल कामगारांची आवश्यकता आहे सुशिक्षित बेकार युवकांनी नौकरी घ्या मागे न लागता स्ट्रॉबेरी ची लागवड करावी असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!