शेकोटीच्या जाळासमोर बसून ‘मराठा आंदोलक आरक्षणासाठी लढा देत आहेत’ हे पहिल्यांदाच वांगीत पाहिले.. : मनोज जरांगे

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा तालुक्यातील वांगीची सभा ही शेकोटी करून केलेली सभा मी आयुष्यात कधी पाहिली नाही व ही सभा मी कधीच विसरू शकत नाही, शेकोटीचा जाळ लावून त्याजाळासमोर आरक्षणासाठी लढा देत आहेत हे मी पहिल्यांदाच पाहिले आहे, त्यामुळे आता माघार नाही.. असे मत मराठा आंदोलक मनोज गरांगे यांनी वांगी 1 (ता.करमाळा) येथे झालेल्या सभेत आज (ता.16) पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास व्यक्त केले.
याबाबत पुढे बोलताना श्री.जरांगे म्हणाले कि, आम्हाला यायला उशीर झाला, परंतु प्रत्येक गावात लोक आडवायला लागले, प्रत्येक गाव अडवतोय हे तुम्ही टीव्ही चॅनलला पहिले असेल, प्रत्यक्षात आमच्या गाडीला मराठा बांधव आडवा झोपत होता, त्यामुळे तुमच्यापर्यंत यायला आम्हाला उशीर झाला परंतु कितीही उशीर झाला तरी आम्ही सभेला येऊ असा शब्द दिला होता, सभेला किती लोक आहेत हे पाहत नाहीत गर्दी झाली तर सभा झाली असे नाही तुम्ही एवढे जरी बसलेला आहात तरी तुम्ही जिल्हा जोडू शकतात याची मला खात्री आहे, शेकोटी करून केलेली सभा ही मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहिले आहे आता हा लढा थांबता कामा नये असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

वांगी 1 येथे सकल मराठा समाजाचे वतीने 171 एकरावर सभेचे भव्यदिव्य नियोजन करण्यात आले होते आलेल्या लोकांना 35000 पाणी बॉटल ची वाटप तसेच म्हणून लाडू चिवड्याचे पाकीट ही लोकांना देण्याची व्यवस्था करण्यात आली होती 35 एकर वर भव्य वाहनासाठी वाहनाचे पार्किंगची सोय करण्यात आली असून जागोजागी गावापासून पाच किलोमीटरच्या परिसरात भगवे झेंडे लाईटची व्यवस्था सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था करण्यात आली होती या सभा शांततेत पार पडण्यासाठी करमाळ्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांनी पोलीस प्रशासनाच्या वतीने चौख बंदोबस्त ठेवला होता.

मराठा आरक्षणाच्या या सभा नियोजनामध्ये सकल मराठा जातीबरोबरच सर्व जाती धर्माच्या लोकांनी सहकार्य करून सभा नियोजनाच्या ठिकाणी परिश्रम घेऊन आपले योगदान दिले आहे, याप्रसंगी हजारो मराठा बांधव या मैदानावर रात्रीच्या थंडीत उपस्थित होते.

