येत्या निवडणूकीत एकत्र काम करण्या संदर्भात खूपसे-पाटील व शरद पवार यांच्यात भेट -

येत्या निवडणूकीत एकत्र काम करण्या संदर्भात खूपसे-पाटील व शरद पवार यांच्यात भेट

0

करमाळा/ संदेश प्रतिनिधी

करमाळा (ता.११) : पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांची अतुल खूपसे पाटील आणि काही प्रमुख कार्यकर्त्यांनी भेट घेतली. यापूर्वी देखील राष्ट्रवादी व जनशक्ती संघटना एकत्रित काम करणार या विषयावर भेटी झाल्या होत्या. मात्र आज (दि.११) पुन्हा एकदा याच विषयावर भेट झाली व शरद पवार यांनी राष्ट्रवादी व शिवसेनेसोबत येण्याचे प्रस्ताव तयार करून द्या अशी विनंती अतुल खूपसे पाटील यांना केली असून येत्या दोन दिवसात जनशक्तीचे अतुल खुपसे पाटील हे महाराष्ट्रातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना सोबत घेऊन याविषयी सविस्तर चर्चा करणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

शेतकऱ्यांचे, सर्वसामान्यांचे आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन जनशक्ती संघटनेने गेल्या तीन वर्षापासून वेगवेगळ्या प्रश्नांवर आंदोलन करून आवाज उठविला आहे. त्यामुळे जनशक्ती संघटना बरोबर आली तर त्याचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो हा विचार ठेवून शरद पवार हे देखील या युतीकडे सकारात्मक दृष्टीने पाहत असल्याचे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!