जरांगे-पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी केम येथे कडकडीत बंद
केम (प्रतिनिधी/संजय जाधव) : करमाळा तालुका सकल मराठा समाजाच्य वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी करमाळा तालुका बंद ची हाक दिली होती याला अनुसरून केम येथील सकल मराठा समाजाच्या केम बंदचे आवाहन केले होते. याला केम येथील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देउन केम येथे कडकडीत बंद पाळला.
मराठा आरक्षणा संबंधित सरकारने आश्वासित केल्याप्रमाणे सगे-सोयरे अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करावे व लवकरात लवकर अंमलबजावणी सुरू करावी, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे आमरण उपोषण सुरू आहे.
केम येथील संपूर्ण बाजारपेठ आज (१४ फेब्रुवारी) बंद होती. गावात सगळीकडे शुकशुकाट होता. या बंद मधुन शाळा वगळण्यात आल्या होत्या. शाळा सुरळीतपणे सुरू होत्या. बंद शांततेत पार पडला. या वेळी सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी सकल मराठा समाजाच्या वतीने पाठिंबा जाहीर केला तसेच येथून पुढे त्यांच्या प्रत्येक आंदोलनात सकल मराठा समाज सहभागी होणार असे सांगण्यात आले.