श्रीदेविचामाळ येथे क्रीडांगणसाठी निधी उपलब्ध करून द्यावा - आमदार शिंदेंना दिले निवेदन - Saptahik Sandesh

श्रीदेविचामाळ येथे क्रीडांगणसाठी निधी उपलब्ध करून द्यावा – आमदार शिंदेंना दिले निवेदन

करमाळा (संदेश प्रतिनिधी): श्रीदेविचामाळ
येथे ग्रामपंचायत नियोजित राजेरावरंभा क्रीडांगण करण्यासाठी निधी आमदार निधीतून उपलब्ध करण्यात यावा यासाठी सरपंच रेणुका सोरटे यांनी आमदार संजयमामा शिंदे यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,श्रीदेविचामाळ येथे ग्रामपंचायत नियोजित राजेरावरंभा क्रीडांगण करण्यासाठीजागा मालमत्ता क्रमांक (४००) चारशे उपलब्ध आहे परंतु त्या ठिकाणाची दुरुस्तीवजा ग्राउंड लेवल करून घेणे गरजेचे आहे. त्या ठिकाणी मोठ मोठे खड्डे आहेत ते बुजून घेण्यासाठी व ग्राउंड लेवलीकरण करणे गरजेचे आहे. तसेच सदर ठिकाणी सिमेंट पिच व निवारा शेड,
वृक्ष लागवड करणे गरजेचे असल्याने तरी सदर कामास अंदाजे ४ ते ५ लाख खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी
आमदार निधीतून मदत मिळावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!