केम मध्ये विद्यार्थ्यांनी चालवला भाजी पाल्याचा बाजार
केम (प्रतिनिधी/संजय जाधव) : आज (दि.३) श्री शिवाजी प्राथमिक विद्या मंदिर व राजाभाऊ तळेकर विद्यालय केम येथे इयत्ता 1 ते 4 थी च्या विध्यार्थ्यांना व्यावाहारिक ज्ञान यावे या साठी सकाळी 9 ते 11 या वेळेत शाळेच्या प्रांगणात आनंदी बाजार भरवण्यात आला. त्यात 100-150 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्याला पालकांनी व गावातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.या आनंदी बाजारात तीस ते पस्तीस हजार रुपयांची उलाढाल झाली.
या बाजाराच्या उद्घाटन प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप दादा तळेकर, संस्थेचे व्हा.चे महेश तळेकर, प्राथमिक चे मुख्याध्यापक नागनाथ तळेकर माध्यमिक चे मुख्याध्यापक विनोद तळेकर , संस्थेचे सदस्य अच्युत काका तळेकर,पै.महावीर तळेकर, दशरथ तळेकर,पै.मदनतात्या तळेकर,सागर तळेकर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व गावातील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.