जिंती येथील अपघातातील महिलेचे निधन - अन्य जखमींवर उपचार सुरू - कार चालकाविरूध्द गुन्हा दाखल - Saptahik Sandesh

जिंती येथील अपघातातील महिलेचे निधन – अन्य जखमींवर उपचार सुरू – कार चालकाविरूध्द गुन्हा दाखल

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : जिंती (ता.करमाळा) येथे काल (ता.२२) सायंकाळी पाचच्या सुमारास कारने क्रुझर या जीपला पाठीमागच्या बाजूस जोराची धडक देऊन झालेल्या अपघातात आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यातील सिताबाई अभिमान जगताप (वय ६२, रा. सौंदे) यांचे जागीच निधन झाले आहे. अन्य जखमींवरती भिगवण येथील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. धडक देणाऱ्या कार चालकाविरूध्द करमाळा पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.

यात शुक्राचार्य बलभिम खंडागळे (रा. गुळसडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की माझ्याकडे चारचाकी क्रुझर कंपनीची गाडी असून तिचा नंबर एमएच १३ बी. एन. २५१८ असा आहे. २२ मे २०२३ रोजी बाळनाथ सुखदेव जगताप (रा. सौंदे) यांच्या मुलाच्या विवाहासाठी मांजरी (पुणे) येथे गेलो होतो. लग्नानंतर सायंकाळी साडेपाच वाजता जिंती येथील रामवाडी चौकात आलो असताना पारेवाडीकडून येणाऱ्या मारूती सुझुकी क्र. एमएच १२ एनपी ९७३२ या कारचालकाने वेगात येऊन माझ्या क्रुझरच्या पाठीमागील बाजूस जोराची धडक दिली. त्यावेळी माझी गाडी फिरून जगदंबा चायनीज हॉटेलला धडकून थांबली.

या अपघातात माझ्या गाडीतील माझ्यासह करण प्रभाकर जगताप, पुष्पा प्रभाकर जगताप, गोदावरी कांतीलाल जगताप, मधुराणी जगन्नाथ जगताप (सर्व रा.सौंदे) तसेच शुभम लबडे (किरकोळ जखमी, रा. शेटफळ), महादेव सुखदेव जगताप व अश्विनी नागनाथ लबडे हे गंभीर जखमी झाले आहेत. यातील सिताबाई अभिमान जगताप या जागीच मयत झाल्या आहेत. अन्य जखमींवर भिगवण येथे उपचार चालू आहेत. या प्रकरणी पोलीसांनी कार चालकाविरूध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर कुंजे हे करत आहेत. –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!