उभ्या असलेल्या ट्रकला चारचाकी धडकून झालेल्या अपघातात जेऊर येथील महिला जागीच ठार -

उभ्या असलेल्या ट्रकला चारचाकी धडकून झालेल्या अपघातात जेऊर येथील महिला जागीच ठार

0

करमाळा (दि.१९) – बुधवारी (दि.१८) सकाळी सहाच्या सुमारास जातेगाव – टेंभुर्णी मार्गावर करमाळा तालुक्यातील कविटगावनजीक उभ्या असलेल्या आयशर ट्रकवर चारचाकी धडकून झालेल्या अपघातात जेऊर येथील एक महिला जागीच ठार झाली तर इतर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. शारदा वाघमोडे असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. 

या अपघाताबाबत सविस्तर माहिती अशी की, जेऊरच्या शारदा वाघमोडे यांच्यावर अकलूज येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार झाल्यानंतर बुधवारी पहाटे  वाघमोडे कुटुंबीय एम.एच.४५ ए एल ८०४६ या चारचाकीतून अकलूजहून जेऊरच्या दिशेने निघाले होते.  उपचार घेऊन   कविटगाव नजीक उभ्या असलेल्या ट्रकवर ही चारचाकी आदळून हा अपघात झाला. या अपघातात डाव्या बाजूला बसलेल्या शारदा वाघमोडे या जागीच ठार झाल्या तर गाडी चालवत असलेले शारदा यांचे बंधू हर्षल वाघमोडे आणि पाठीमागील सीटवर बसलेल्या त्यांच्या आई हे दोघे गंभीर जखमी झाले. दोघांवर बार्शी येथील उपचार सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!