तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा केम येथे उत्स्फूर्तपणे संपन्न - Saptahik Sandesh

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा केम येथे उत्स्फूर्तपणे संपन्न

केम (संजय जाधव) :    तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेचे आयोजन केम येथील राजाभाऊ तळेकर या  प्रशालेत करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेते व उपविजेते संघांना ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.  क्रीडा प्रकारामध्ये सांघिक लंगडी, कबड्डी, खो-खो व वैयक्तिक मध्ये बुद्धिबळ,100 मीटर व 200 मीटर धावणे मुले- मुली लहान व मोठा गट या स्पर्धा संपन्न झाल्या.

या स्पर्धेचे उदघाटन करमाळा तालुका पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी जयवंत नलवडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्या समवेत विस्ताराधिकारी श्री नितीन कदम , विस्ताराधिकारी श्री मिनीनाथ टकले, राजाभाऊ विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री मनोज तळेकर,महात्मा फुले समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष महेश तळेकर, शिवाजी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री नागनाथ तळेकर व केम केंद्राचे केंद्रप्रमुख महेश्वर कांबळे, कंदर केंद्राचे केंद्रप्रमुख साईनाथ देवकर, जेऊर केंद्राचे केंद्रप्रमुख बापू भंडारे, वांगी केंद्राचे केंद्रप्रमुख सतीश चिंदे सर ,चिकलठाण केंद्राच्या केंद्रप्रमुख पांडव, वीट केंद्राच्या केंद्रप्रमुख श्रीमती वैशाली महाजन मॅडम, जातेगाव केंद्राचे केंद्रप्रमुख रमाकांत गटकळ,करंजे केंद्राचे केंद्रप्रमुख संजय मुंडे, कोर्टी केंद्राचे केंद्रप्रमुख आदिनाथ देवकते, देवळाली केंद्राचे केंद्रप्रमुख राजकुमार खाडे हे उपस्थित होते.


स्पर्धेची सुरुवात मुलांच्या कबड्डीचा सामना घेऊन झाली. दुसऱ्या दिवसाचे उद्घाटन A P ग्रुपचे अध्यक्ष अच्युत काका तळेकर पाटील, करमाळा तालुका बाजार समितीचे माजी संचालक महावीर आबा तळेकर, युवासेना अध्यक्ष माननीय सागर राजे तळेकर  व ग्रामपंचायत सदस्य विष्णू अवघडे यांच्या हस्ते उद्घाटन होऊन मुलींच्या कबड्डीच्या उद्घाटनाच्या सामन्याने झाली.

या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पंच म्हणून कबड्डी – तात्यासाहेब जाधव, भाऊसाहेब गायकवाड, कृष्णा काळेल, सचिन शिंदे, खो-खो चे पंच -म्हणून राज्य
स्तरीय पंच- श्री शहाबुद्दीन मुलानी सर ,महादेव भारती सर ,रमेश कोडलिंगे सर, प्रताप राऊत सर ,शिवाजी लोकरे सर व अजित दादा विद्यालय वडशिवनेचे भागवत सर.
लंगडी या खेळासाठी पंच म्हणून किरण सानप सर, रेवननाथ देवकर ,शशिकांत तळेकर, धनाजी शिंदे , केशव देवकर यांनी जबाबदारी पार पाडली. त्याचबरोबर केमधील माध्यमिक विद्यालयाचे कुंडलिक वाघमारे सर ,दादा अवताडे सर ,सुदाम कुरडे सर ,श्रीकृष्ण बेरे सर या माध्यमिक शिक्षकांनीही पंच म्हणून जबाबदारी पार पाडली.


बुद्धिबळ खेळाचे पंच म्हणून विवेक पाथ्रुडकर सर व मिनीनाथ टकले यांनी जबाबदारी पार पाडली .त्याचबरोबर 100 मीटर व 200 मीटर धावणे या खेळाची जबाबदारी बापू भंडारे सर, अच्युत कोल्हे सर, तुकाराम तळेकर सर व महेश्वर कांबळे सर यांनी पार पडली.
स्पर्धेचे गुणलेखक ,टाईम कीपर म्हणून  केम  व कंदर केंद्रातील शिक्षक ,BRC स्टॉप यांनी सर्व जबाबदारी पार पाडली.  स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राजाभाऊ तळेकर विद्यालयाचे सर्व शिक्षक ,शिवाजी प्राथमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक व सर्व कर्मचारी वर्ग यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!