ॲड.आढाव दांपत्य हत्या प्रकरण – करमाळा वकील संघाकडून निषेध – “वकील संरक्षण कायदा” करण्याची निवेदनाद्वारे मागणी…

करमाळा / संदेश प्रतिनिधी : राहुरी (जि.अहमदनगर) तालुक्यातील ॲड.राजाराम जयवंत आढाव व त्यांची पत्नी ॲड.मनिषा राजाराम आढाव या वकील दाम्पत्यांची निर्घुण, अमानवी हत्या झाली असून, या घटनेचा करमाळा वकील संघाने जाहीर निषेध केला आहे. सदरच्या घटनेची दखल घेवून ‘वकील संरक्षण कायदा’ त्वरीत मंजूर करावा व सदर आरोपींना कडक शिक्षा करण्यात यावी अशी मागणी करमाळा वकील संघामार्फत दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. सदर निवेदन करमाळा येथील तहसीलदार यांना देण्यात आले.

या घटनेने संपुर्ण महाराष्ट्रातील वकील हादरून गेलेले आहेत, अशा प्रकारे एखाद्या वकील दाम्पत्यांवर घटना घडत असेल तर संपुर्ण न्यायव्यवस्थेसाठी ही चिंताजनक बाब आहे. पोलीस प्रशासनांनी याबाबत त्वरीत कारवाई आरोपींना अटक केले असले तरी या आरोपींना जलदगतीने कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करून कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करमाळा वकील संघाकडून निवेदन देवून करण्यात आली आहे.

आढाव वकील दाम्पत्यास करमाळा वकील संघाच्यावतीने श्रध्दांजली वाहण्यात आली, सदरच्या घटनेची दखल घेवून ‘वकील संरक्षण कायदा’ त्वरीत मंजूर करावा व सदर आरोपींना कडक शिक्षा करण्यात यावी अशीही मागणी करमाळा वकील संघामार्फत दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. सदर निवेदन करमाळा येथील तहसीलदार यांना देण्यात आले. याप्रसंगी करमाळा वकील संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!