करमाळा वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. राम निळ बिनविरोध... -

करमाळा वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. राम निळ बिनविरोध…

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. राम निळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. करमाळा वकील संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये नवीन पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.


या निवडीत अध्यक्षपदी ॲड.राम निळ यांची बिनविरोध निवड झाली असून उपाध्यक्षपदी ॲड. आलिम पठाण यांची निवड करण्यात आली आहे. तर सचिव म्हणून पुन्हा एकदा ॲड.विनोद चौधरी यांची निवड करण्यात आली आहे. सहसचिव म्हणून ॲड.बालाजी इंगळे यांची निवड करण्यात आली आहे.


ही संपूर्ण प्रक्रिया वकील संघाचे मावळते अध्यक्ष ॲड.रवींद्र बरडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत सचिव ॲड. विनोद चौधरी यांनी गत वर्षाचा अहवाल सादर केला. व्यासपीठावर संघाचे मावळते उपाध्यक्ष ॲड. सुनील रोकडे उपस्थित होते.
वकील संघाच्या परंपरेनुसार, सेवाज्येष्ठतेनुसार अध्यक्षपदाचा मान दिला जातो. यानुसार ॲड. राम निळ यांना संधी देण्यात आली आहे. त्यांच्या निवडीनंतर मावळते अध्यक्ष ॲड.बरडे यांनी त्यांचे स्वागत करून सन्मानपूर्वक स्थानापन्न केले.

या प्रसंगी उपस्थित सर्व नविन पदाधिकाऱ्यांचे वकील संघातर्फे स्वागत करण्यात आले. संघात नवीन नेतृत्वाबाबत सकारात्मक आणि उत्साही वातावरण दिसून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!