आदर्श शिक्षक ना. भ. माने यांचे निधन

करमाळा (दि.११): येथील रहिवाशी असलेले व खडकेवाडी शाळेचा आदर्श पॅटर्न निर्माण करणारे आदर्श शिक्षक नामदेव माने तथा ना.भ. माने गुरूजी (वय – ७४) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
खडकपुरा भागात श्री. माने यांचा रहिवास होता. त्यांचे मुळगाव खडकेवाडी असून त्याच शाळेत त्यांनी आदर्श शाळेची पायाभरणी केली. करमाळ्याहून थेट एसटी बस विद्यार्थ्यांना घेऊन या शाळेत शिक्षणासाठी जात होती. आदर्श शाळेचा राष्ट्रीय पुरस्कार खडकेवाडी शाळेला मिळाला आहे. दरम्यानच्या कालावधीत पोस्टाच्या सेव्हींग तसेच आर.डी.ची कामेही त्यांनी केलेली आहेत. त्यांच्या आकस्मीत जाण्याने शिक्षण विभागातील अनेकांना धक्का बसला आहे. आज सायंकाळी पाच वाजता त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.






