श्री कमलाभवानी मंदिर देवस्थानसाठी 4 कोटी निधीस प्रशासकीय मान्यता - आमदार संजयमामा शिंदे - Saptahik Sandesh

श्री कमलाभवानी मंदिर देवस्थानसाठी 4 कोटी निधीस प्रशासकीय मान्यता – आमदार संजयमामा शिंदे

आमदार संजयमामा शिंदे

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : करमाळा तालुक्याचे आराध्य दैवत श्री कमलाभवानी मंदिर देवस्थानसाठी 4 कोटी निधीस प्रशासकीय मान्यता व निधी वितरणाचे आदेश प्राप्त झाले आहेत अशी माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली आहे.

Yash collection karmala clothes shop

पुणे विभागातील प्रादेशिक पर्यटन विकास योजना सन 2021- 22 अंतर्गत नवीन कामांना 83 कोटी 54 लाख निधी मंजूर झाला असून त्यापैकी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यासाठी 4 कोटी निधी मंजूर झाला असून, त्यापैकी दीड कोटी निधी जिल्हा परिषद सोलापूरकडे 29 मार्च 2022 रोजी वर्ग करण्यात आला होता. सदर निधीसाठी प्रशासकीय मान्यतेची आवश्यकता असल्यामुळे जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांचेकडून 30 ,जून 2022 रोजी सदर कामाला प्रशासकीय मान्यता देऊन 4 कोटी पैकी 1 कोटी 50 लाख निधी वितरणाचे आदेश देण्यात आला असल्याची माहिती करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली आहे.

Sonaraj metal and crockery karmala


करमाळा शहराजवळील श्री देवीचामाळ हे ‘ब’ वर्ग तिर्थक्षेत्र आहे. या तीर्थक्षेत्रसाठी आ.संजयमामा शिंदे ज्या वेळेस जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते, त्यावेळी त्यांनी भरीव निधी दिलेला होता. आमदार झाल्यानंतर त्यांनी पर्यटन विभागाकडून यावर्षी प्रथमच मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून विधानसभा निवडणुकीच्यावेळी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली आहे.

S.K. collection bhigwan

या निधीमधून कमलादेवी मंदिराकडे जाणारे रस्ते सिमेंट काँक्रीट करणे व व पेविंग ब्लॉक बसवणे यासाठी 99. 80 लक्ष ,श्रीक्षेत्र कमला देवी मंदिराकडे जाणारे रस्ते डांबरीकरण करणे यासाठी 67. 64 लक्ष, श्रीक्षेत्र कमलादेवी मंदिर क्षेत्रास संरक्षक भिंत बांधणे यासाठी 148. 76 लक्ष,श्री. कमलादेवी मंदिरासाठी वाहनतळ करणे 90.40 लक्ष, कमलादेवी मंदिराकडे जाणारे रस्त्यासाठी स्ट्रीट लाईट बसवणे 15 लक्ष, कमलादेवी मंदिर यात्री निवास बांधने 80 . 54 लक्ष , कमलादेवी मंदिर क्षेत्र स्नानगृह, मुतारी बांधणे 21.72 लक्ष, मंदिर परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा बसविणे 6 लक्ष ही कामे या निधीमधून होणार आहेत. श्री कमलाभवानी मंदिरास प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध झाल्यामुळे मंदिराचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होणार आहे. हा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल देवीचामाळ ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांनी आमदार संजयमामा शिंदे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Sonali ply and furniture shop karmala

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!