करमाळा वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. रविंद्र बरडे यांची निवड - वकील संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न.. -

करमाळा वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. रविंद्र बरडे यांची निवड – वकील संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न..

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : करमाळा वकील संघाचे अध्यक्षपदी ॲड.रविंद्र बरडे तर उपाध्यक्षपदी ॲड.सुनील रोकडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे, करमाळा वकील संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा ॲड.डी.एम.सोनवणे यांच्या अध्यक्षतेखली पार पडली असून, या सभेत सदर निवडी करण्यात आली आहे.

या निवडी दरम्यान करमाळा वकील संघाचे नूतन अध्यक्ष म्हणून करमाळा वकील संघाचे ॲड.रविंद्र बरडे यांची निवड एकमताने करण्यात आली असून, उपाध्यक्षपदी ॲड.सुनील रोकडे, सचिवपदी ॲड.विनोद चौधरी तसेच सहसचिवपदी ॲड.शेखर घाडगे व खजिनदार म्हणून ॲड.प्रशांत बागल यांची निवड करण्यात आली आहे.

याप्रसंगी नवीन कार्यकारणीचे स्वागत करमाळा वरिष्ठ न्यायालयाच्या न्यायाधीश मीना एखे यांनी केले, या वार्षिक सर्वसाधारण सभेस करमाळा वकील संघाचे सर्वच सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड.व्ही.व्ही.चौधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन ॲड.जयदीप देवकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!