उमरड प्राथमिक शाळेत आजी आजोबा पूजन उपक्रम संपन्न -

उमरड प्राथमिक शाळेत आजी आजोबा पूजन उपक्रम संपन्न

0

करमाळा (दि.५) : उमरड (ता.करमाळा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत आजी आजोबा पूजन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

या उपक्रमाचे उद्घाटन ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद वामनराव बदे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय कोठावळे व गावचे पोलीस पाटील अंकुश कोठावळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित आजींनी केले. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी आजी आजोबांचे पूजन करून त्यांना वंदन केले. त्यानंतर उपस्थित आजी-आजोबांची संगीत खुर्ची हा मनोरंजक खेळ घेण्यात आला. यावेळी अतिशय उत्साहाने या खेळात आजी-आजोबांनी सहभाग घेतला सर्व आजी आजोबांचे नातवांचे प्रेम पाहून हृदय भरून आले चिमुकली मुले आपल्या आजी आजोबांचे औक्षण करत होती.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी श्री अमृळे गुरुजी भोसले गुरुजी ढाकणे गुरुजी राऊत गुरुजी यादव गुरुजी साळुंखे मॅडम यांनी परिश्रम घेतले या उपक्रमाचे गटशिक्षणाधिकारी नलवडे साहेब मिनीनाथ टकले व अमृत सोनवणे  यांनी कौतुक केले.

आजी आजोबांचा सन्मान करणे आजी आजोबांना त्यांच्या मुलांच्या मुलांवर प्रेम दाखवण्याची संधी देणे व मुलांना शक्ती माहिती आणि वृद्ध लोकांचे मार्गदर्शन याबद्दल जागरूक होण्यास मदत करणे या उद्देशाने आमच्या शाळेने राबविलेला हा उपक्रम नातेसंबंध जपण्यासाठी उपयुक्त असा आहे या उपक्रमाबद्दल शाळेतील सर्व शिक्षकांचे मनःपूर्वक आभार.

●  श्री अंकुश कोठावळे, पोलीस पाटील

विद्यार्थ्याकडून आजी-आजोबांचे पद्य पूजन करण्यात आले संगीत खुर्चीसह सर्व आजी-आजोबांनी या उपक्रमाचा आनंद लुटला भारतीय संस्कृती जतन करण्याचं काम या उपक्रमाच्या माध्यमातून केले जाणार आहे.

●  श्री प्रमोद बदे, सरपंच, उमरड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!