दहावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी नोट्सचे वाटप – रोटरी क्लब व जगदाळे क्लासेसचा उपक्रम

करमाळा (दि.६) : रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी आणि जगदाळे कोचिंग क्लासेस वाल्हेकरवाडी (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने शारदाताई पवार विद्यालय केम, अजित दादा पवार विद्यालय वडशिवणे व संजय मामा माध्यमिक विद्यालय भोगेवाडी, या शाळेतील इयत्ता दहावी मराठी मिडीयम च्या एकूण 88 विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी अति महत्त्वाच्या प्रश्नाच्या नोट्सचे मोफत वाटप करण्यात आले.

या नोट्समध्ये गुणांनुसार प्रश्नांचे विभाजन केलेले असून सर्व विषयाच्या नोट्स एकाच बुक मध्ये देण्यात आलेले आहेत या नोट्समुळे विद्यार्थ्यांच्या किमान 30 ते 40 टक्के गुणांमध्ये वाढ होऊ शकते असे रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी चे अध्यक्ष गोविंद जगदाळे सर यांनी माहिती दिली. या नोट्स ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ व्हावी आणि त्यांनाही उच्च शिक्षणाची संधी मिळावी ही या मागची भूमिका असल्याचे रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री गोविंद जगदाळे यांनी व्यक्त केली.

यावेळी सर्व शिक्षकांनी या नोट्सची पाहणी केली आणि त्याबद्दल समाधान व्यक्त केले. या नोट्समुळे सर्वच विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल असे मत शारदाताई विद्यालय केम येथील हिंदी विषयाचे शिक्षक श्री प्रकाश जाधव सर , तसेच या शाळेतील गणित शिकवणारे शिक्षक श्री माने सर आणि वडशिवणे येथील इयत्ता दहावीचे वर्गशिक्षक कोरे सर यांनी व्यक्त केले. जगदाळे सर हे मूळचे वडशिवणे गावचे असून त्यांचे वाल्हेकरवाडी (पुणे) येथे जगदाळे कोचिंग क्लासेस नावाचे विद्यार्थ्यांसाठीचे क्लासेस सुरू आहेत.




