वृद्धांसाठी अन्न-औषधोपचारा बरोबरच आपुलकी आणि जिव्हाळ्याची गरज- गौरी धुमाळ
करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.12: वृद्धांसाठी अन्न-औषधोपचारा बरोबरच आपुलकी जिव्हाळ्याची गरज असते. प्रत्येक व्यक्तीचा सन्मान महत्त्वाचा असतो. अनेकजण घरात आत्मसन्मान सांभळला जात नाही, म्हणून घर सोडतात. त्यामुळे या व्यक्तीच्या भावना जपणे गरजेचे असते, असे मत स्वामी निवास वृध्दाश्रमच्या अध्यक्षा गौरी धुमाळ
यांनी व्यक्त केले आहे.
येथील गुरुमाऊली बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाळासाहेब गोरे यांनी मातोश्री वृद्धाश्रमाची स्थापना केली आहे. त्याचा शुभारंभ श्रीमती धुमाळ व शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव आशाताई मोरजकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी श्रीमती धुमाळ बोलत होत्या.
यावेळी कार्यक्रमाच्या आध्यक्षस्थांनी जेष्ठ शिक्षक लिंबराज जाधव हे होते. व्यासपीठावरती विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, यश कल्याणी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील प्राचार्य नागेश माने,ग्राम सुधार समितीचे अध्यक्ष डॉक्टर एडवोकेट बाबुराव हिरडे ,एकलव्य आश्रम शाळेचे संस्थापक रामकृष्ण माने, ज्येष्ठ कवी प्रकाश लावंड, भाजपाचे ज्येष्ठ नेते घनश्याम भाई गांधी, मनसेचे तालुकाप्रमुख संजय घोलप, सामाजिक कार्यकर्ते विनय ननवरे, अश्पाक जमादार, अशीश गायकवाड,नितीन भोगे आदी मान्यवर व्यासपीठावरती उपस्थित होते.
पुढे बोलताना श्रीमती धुमाळ म्हणाल्या की,समाजामध्ये सर्व काही उपलब्ध आहे परंतु माणसाला माणसाशी प्रेमाने वागावे हे शिकवावे लागते.कदाचित परिवारातील असणारे प्रेम आटल्यामुळे माणसांना वृद्धाश्रमाची पायरी चढावी लागते. त्यामुळे वृद्धाश्रमात आल्यानंतर या माणसांना प्रेम सहानुभूती आपुलकी याचबरोबर आपलं कोणीतरी आहे अशी भावना निर्माण झाल्यास या माणसाचं जगणं सुसाह्य होऊ शकतं त्यामुळे त्यांची काळजी घेणं ही काळाची गरज आहे. त्यांना औषधोपचार मानसिक स्वास्थ्य आणि त्याचबरोबर त्यांच्याशी गप्पाटप्पा मारणारे त्यावयाचे मित्र असावे लागतात. त्यातूनच यांना खरा आनंद मिळत असतो.
आशाताई मोरजकर यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ,सेवेचे व्रत्त पुर्ण केले पाहिजे. वृध्दाश्रमातील कर्म ही एक सेवा आहे. ते आनंदाने करावे लागते. ते ज्येष्ठ असलेतरी त्यांचे आई-बाप होवून काम करावे लागते असे सांगितले .
यावेळी कवी नवनाथ खरात, मनसेचे तालुकाप्रमुख संजय घोलप ,एकलव्य आश्रम शाळेचे संस्थापक रामकृष्ण माने ,यश कल्याणी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील,विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे ग्रामसेवक समितीचे अध्यक्ष डॉ. ॲड.बाबूराव हिरडे व अध्यक्ष जाधव यांची भाषणे झाली. यावेळी प्रास्ताविक संस्थापक बाळासाहेब गोरे यांनी केले.उपस्थितांचे स्वागत संस्थेचे सचिव गणेश गोरे तसेच संचालिका सौ मीना गोरे ,मेघा गणेश गोरे डॉ. गौरी पवार ,खलील शेख यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजकुमार खाडे यांनी केले तर आभार तात्यासाहेब जाधव यांनी मानले.