“आमदार आपल्या दारी” हा उपक्रम १८ ऑक्टोबरला जेऊर येथे होणार – नागरिकांनी लाभ घ्यावा : आमदार श्री.शिंदे
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना थेट त्यांच्या दारापर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने ‘आमदार आपल्या दारी’ हा उपक्रम करमाळा तालुक्यात राबविण्यात येत आहे. १८ ऑक्टोबरला स्वामी विवेकानंद पतसंस्था हॉल जेऊर (ता.करमाळा) येथे घेण्यात येणार आहे, तरी या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन आमदार संजयमामा शिंदे यांनी केले आहे.
यामध्ये नागरिकांना नवीन रेशनकार्ड, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल योजना आणि नवीन मतदार नोंदणी, उज्वला गॅस योजना, एस.टी. बस पास, मोतीबिंदू तपासणी व उपचार, आधार कार्ड नोंदणी, ई श्रम नोंदणी, दिव्यांग नोंदणी, असंघटित कामगारांची नोंदणी अशा विविध शासकीय योजनांच्या पात्रतेचे निकष सांगण्यात येतील.
तसेच पात्र गरजु नागरिकांचे अर्ज कार्यक्रम स्थळी स्वीकारण्यात येवून त्यांची विविध योजनांसाठी निकषाप्रमाणे निवड करण्यात येईल. तरी नागरिकांनी या सर्व शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्व कागदपत्रे घेऊन शिबिराच्या ठिकाणी उपस्थित राहावे. असेही त्यांनी म्हटले आहे, या उपक्रमात सहभागी गावे – दहिगाव, शेलगाव भा, लव्हे, निंभोरे, शेटफळ ,जेऊरवाडी, जेऊर.