कानाडगल्लीत मटका घेणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल - Saptahik Sandesh

कानाडगल्लीत मटका घेणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : करमाळा शहरातील कानाडगल्ली मटका चालविणाऱ्या तिघांवर पोलीसांनी गुन्हे दाखल केले आहे. हा प्रकार १४ ऑक्टोबरला सकाळी पावणेअकरा वाजता घडला आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ महादेव जगताप यांनी फिर्याद दिली आहे.

त्यात त्यांनी म्हटले आहे, की करमाळा शहरातील कानाडगल्लीत बेकायदेशीर मटका सुरू असल्याची माहिती मिळाल्यावर तेथे गेलो असता, सादिक युसूफ तांबोळी (रा. कानाडगल्ली) हा पांढऱ्या रंगाच्या स्लीपवर आकडे घेत असताना आढळून आला. त्याच्याकडून पांढऱ्या रंगाचे स्लीपचे पुस्तक, निळ्या शाईचा बॉलपेन व १८९० रूपये रोख जप्त करण्यात आले आहेत.

तसेच याच गल्लीत राजेंद्र आत्माराम आहेर (रा. सुमंतनगर, करमाळा ) हा पेट्रोल पंपाजवळील टपरीच्या आडोशाला बसून मटक्याचे आकडे घेत होता. त्याच्याकडूनही पांढऱ्या रंगाचे स्लीपचे पुस्तक, निळा पेन व रोख ९५० रू. जप्त केले आहेत.

तसेच याच पेट्रोलपंपाशेजारी बाळासाहेब शिवदास माने (रा. कानाडगल्ली) हा ही कल्याण नावाचा मटका घेत असताना आढळून आला आहे. त्याच्याकडूनही पांढऱ्या रंगाचे पुस्तक, निळ्या शाईचा बॉलपेन व ११७० रू. जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलीसांनी प्रत्येकांवर स्वतंत्र गुन्हे दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!