सोलापूर जिल्हा काँग्रेस (इंटक) अध्यक्षपदी करमाळा येथील अमोल जाधव यांची नियुक्ती
करमाळा (दि.१५) – काँग्रेस (इंटक) सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी करमाळा येथील अमोल जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर निवड राष्ट्रीय अध्यक्ष डॉ संजीवजी रेड्डी यांच्या आदेशाने व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ कैलास (भाऊ) कदम व महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बाबासाहेब चव्हाण यांनी संघटनात्मक घोषणापत्र देऊन केली.
निवडीनंतर जाधव म्हणाले प्रत्येक तालुक्यातील, गावातील तसेच शहरातील संघटित असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या न्याय हक्कासाठी व संघटना वाढीसाठी प्रयत्न करुन संघटना वाढवील तसेच महाराष्ट्र इंटकचा नावलौकिक वाढवून संघटना वाढीसाठी प्रयत्न करुन नागरिकांना काँग्रेस (इंटक) पक्षाचे लक्ष व धोरणे समजावून काँग्रेस (इंटक) चे कार्य तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम तन मन धनाने करेन.
जाधव यांच्या निवडीनंतर त्यांचे सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.