'भारत जोडो' यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करत असुन, यात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी सर्वांनी तयार रहावे - प्रतापराव जगताप - Saptahik Sandesh

‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करत असुन, यात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी सर्वांनी तयार रहावे – प्रतापराव जगताप

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करत असुन, पुढील आठवड्यानंतर राहुल गांधी हे महाराष्ट्रात येत आहेत, यात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी सर्वांनी तयार रहावे असे प्रतिपादन अखिल भारतीय काँग्रेस आय चे तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांनी केले.

साडे (ता.करमाळा) येथील काँग्रेस आय पक्षाच्या शाखा उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी साडे येथील युवा नेते योगेश लोंढे,अमर अनभुले,वैभव ढवळे,रोहीत सुपे,भाऊ वैद्य,राज मस्तुद,अजय गावडे,सादिक शेख,बापुसाहेब सुपे,मुकुंद ढवळे उपस्थित होते.
अधिक बोलताना श्री जगताप म्हणाले कि राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही महाराष्ट्रात नांदेड येथे दिनांक ७ नोव्हेंबर रोजी प्रवेश करीत आहे.

संपुर्ण महाराष्ट्र या यात्रेचे अतिशय जल्लोषात स्वागत करण्यासाठी सज्ज आहे.देशात वाढत चाललेली अराजकता याला सर्वजण कंटाळले असुन देशाचे भविष्य अंधारमय होत चालले आहे.देशात पुन्हा एकदा काँग्रेस व मित्र पक्षाचे सरकार आल्याशिवाय रहाणार नाही असे वातावरण संपुर्ण देशात तयार झाले आहे. महागाईने त्रस्त झालेला सामान्य नागरीक आतुरतेने निवडणुकीची वाट पहाताना दिसतो आहे.मा.राहुलजी गांधी यांच्या विचाराने प्रेरीत होऊनच मा.आ.प्रणितीताई शिंदे व जिल्हाध्यक्ष मा.धवलसिंह मोहीते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपुर्ण तालुक्यात काँग्रेस पक्षाचे विचार शाखेच्या माध्यमातुन पोहचवण्याचा आपला मानस असल्याचे प्रतापराव जगताप यांनी व्यक्त केले.

योगेश लोंढे यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवुन सदर शाखेचे उद्घाटन संपन्न झाले, यावेळी साडे ग्रामस्थांच्यावतीने मुकुंद ढवळे यांच्या शुभहस्ते तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी गितेश लोकरे,उत्तरेश्वर सावंत,नितीन चोपडे,सचिन कटारिया आदींचाही सत्कार करण्यात आला.

हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी शाखाध्यक्ष गणेश फरतडे, उपाध्यक्ष-विशाल मस्तुद,सचिव-तानाजी फरतडे,सहसचिव-सागर रोकडे,खजिनदार-समाधान सुपे,सहखजिनदार-स्वप्निल सुपे यांनी अथक परिश्रम घेतले व पक्षवाढीसाठी सतत प्रयत्नशील रहाणार असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!