गावा-गावातील जेष्ठ नागरिकांचा नैतिकतेचा धाक पुन्हा निर्माण करण्याची गरज – गटविकास अधिकारी मनोज राऊत

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : जेष्ठांच्या नैतिक धाकाची गरज बिघडत चाललेली समाज व्यवस्था सुधारण्यासाठी गावा- गावातील जेष्ठ नागरिकांचा नैतीकतेचा धाक पुन्हा निर्माण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी व्यक्त केले.

शेटफळ (ता.करमाळा) येथे जिव्हाळा ग्रुपच्या वतीने दिपावली निमित्त जेष्ठ नागरिकांना आधाराची काठी व गरजूंना थंडीसाठी उबदार ब्लॅंकेट भेट देण्याच्या कार्यक्रमात बोलताना केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लातूर येथील नगरविकास विभागाचे सह आयुक्त रामदास कोकरे होते.

यावेळी त्यांच्या हस्ते किल्ले बांधणी स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण व नोकरी व्यवसाय निमित्त बाहेरगावी असलेल्या व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व कोवीड काळात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. पुढे बोलताना गटविकास अधिकारी राऊत म्हणाले की, आज गावोगावी तरूणांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढले आहे तरूण पिढी व्यसनाच्या आहारी जाऊ लागली आहे पुर्वी कुटुंबातील वडीलधारी मंडळींचा धाक आसल्याने चुकीच्या गोष्टींना आळा बसत आसे सध्या घरातील ज्येष्ठ मंडळींचा धाक कमी झाल्याने कुटूंब व्यवस्था आडचणीत आली आहे.

यावेळी बोलतांना रामदास कोकरे म्हणाले की, शेतकऱ्यांनी आपल्या शेतात विविध प्रयोग केले पाहिजेत शाश्वत शेतीवर भर दिला पाहिजे. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या शेतमालाच्या बाजारपेठेचा अभ्यास केला पाहिजे व आपली आणी आपल्या कुटुंबाची प्रगती साधली पाहिजे. या संदर्भात शेटफळ येथील तरूणांचा अदर्श‌ इतरांनी घेतला पाहिजे.

सुरवातीला कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रसाद पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गजेंद्र पोळ यांनी केले तर आभार नवनाथ नाईकनवरे यांनी मानले, या कार्यक्रमाला सरपंच विकास गुंड, उपसरपंच आनंद नाईकनवरे प्रसिद्ध किर्तनकार विठ्ठल पाटील महाराज बापूराव नाईकनवरे प्रा.महेश निकत, ग्रामसेवक सचिन सरडे,तलाठी ईश्वर कदम, वैभव पोळ, नवनाथ नाईकनवरे, विजय लबडे, नानासाहेब साळूंके, प्रशांत नाईकनवरे, डॉ सुहास लबडे, महेश नाईकनवरे, प्रमोद मोरे, राजेंद्र साबळे, कैलास लबडे महावीर निंबाळकर वैभव शिंदे, अमोल साकला यांचेसह या परिसरातील नागरीक बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!