करमाळा शहरातील ईव्हीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न -प्रशासनाचा तात्काळ हस्तक्षेप
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – करमाळा शहरातील शाळा नं. २ येथील मतदान केंद्रावर एका तरुणाने अचानक ईव्हीएम मशीन तसेच व्हीव्ही पॅट मशीन हातोड्याने फोडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप केला. तसेच पोलीसांनी संबंधित व्यक्तीस ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला आहे.तहसीलदार शिल्पाताई ठोकडे यांनी तात्काळ भेट देऊन नागरीकांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त केले आहे.
करमाळा शहरात दिवसभर शांततेत मतदान सुरू असताना सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास एक मनोरुग्ण मतदान करण्यासाठी आला व त्याने ईव्हीएम मशीन तसेच व्हीव्हीपी मशीन हातोडा मारून फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यास यश आले नाही. हा प्रकार चालू असताना अधिकारी व पोलीसांनी संबंधितास ताब्यात घेतले व अनर्थ टळला. पोलीसांनी त्यास ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान संबंधित व्यक्ती मनोरुग्ण असल्याचे समजते
ही घटना समजताच तहसीलदार शिल्पाताई ठोकडे तसेच मंडल अधिकारी राजाभाऊ राऊत यांनी घटनास्थळी भेट देऊन सर्व माहिती घेतली. तसेच पोलीसांना योग्य त्या सूचना केल्या व मतदारांना वस्तुस्थिती सांगून मतदान पूर्ववत सुरू केले.