माजी मुख्याध्यापिका दमयंती कवडे यांचे निधन - Saptahik Sandesh

माजी मुख्याध्यापिका दमयंती कवडे यांचे निधन

करमाळा (संदेश प्रतिनिधी) : करमाळा नगरपरिषद मुले मुलींच्या शाळा नंबर 2 च्या माजी मुख्याध्यापिका सौ दमयंती रमेश कवडे यांचे आज सोमवारी (दि.६ मे) सायंकाळी ४ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. अकलूज येथील इनामदार हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार चालू होते उपचार चालू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांचा अंत्यविधी आज (दि.६) रात्री दहा वाजता टेंभुर्णी येथे पार पडला. अंत्यविधीवेळी नातेवाईकांसह शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पती चार मुली जावई नातवंडे असा परिवार आहे. शिस्तप्रिय शिक्षिका म्हणून त्यांची विशेष ओळख होती. करमाळा येथील कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक रमेश कवडे यांचे ते पती होत तर करमाळा येथील अ‍ॅड.प्रमोद जाधव यांच्या त्या सासू होत्या. त्यांच्या निधनानंतर शहरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!