मकर संक्रांतीनिमित्त उत्तरेश्वर मंदिरात फुलांची आकर्षक सजावट
केम(संजय जाधव): केम येथील ग्रामदैवत श्री उत्तरेश्वर मंदिरामध्ये मकर संक्रातीनिमित्त शिवलिंगास विविध सुंदर रंगीबेरंगी फुलांची सजावट व पानाची मखर करण्यात आली. हि सजावट श्री चे पुजारी समाधान गुरव यांनी केली.
मकर संक्राती निमित्त महिलांनी ओवसायसाठी मंदिरात गर्दी केली होती.ही सजावट महिलांचे लक्ष वेधून घेत होती भोगी पासून मंदिरात शिवलिंगास सजावट केली.
मकर संक्राती निमित्त शिवलिंगास सुंदरअशी फुलांची व पानाची, मकराची सजावट मंदिराचे पुजारी समाधान गुरव यांनी केली. त्यामुळे आम्हा महिलांना मंदिरात ओवसायला गेल्यावर समाधान व प्रसन्न वाटले.
● सौ वर्षाताई चव्हाण, उबाठा शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख