प्राथमिक शिक्षक सह.पतसंस्थेचा आदर्श शिक्षक पुरस्कार सयाजीराजे ओंभासे यांना जाहीर -

प्राथमिक शिक्षक सह.पतसंस्थेचा आदर्श शिक्षक पुरस्कार सयाजीराजे ओंभासे यांना जाहीर

0

करमाळा (दि.२१) –  सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था दरवर्षी उपक्रमशील प्राथमिक शिक्षक सभासदांचा ‘आदर्श शिक्षक’ हा पुरस्कार देऊन गौरव करत असते. या वर्षीच्या पुरस्कारासाठी संस्थेने करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांबुळझरा या शाळेतील शिक्षक सयाजीराजे केशव ओंभासे यांची निवड करण्यात आली आहे.

श्री. ओंभासे यांची प्राथमिक शिक्षणातील भरीव कार्याची, उल्लेखनीय उपक्रमांची दखल पतसंस्थेच्या संचालक मंडळाने घेतली व यावर्षीच्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी  निवड केली. हा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ रविवार दिनांक २२/९/२०२४ रोजी दुपारी ठिक १२.०० वाजता विठ्ठल रुक्मिणी पॅलेस, प्रशांत परिचारक नगर, कोर्टी रोड, पंढरपूर येथे आयोजित केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!