सोलापूर जिल्हा गटसचिवांची सह.पतसंस्थेच्या चेअरमनपदी बबनराव मेहेर तर व्हा.चेअरमनपदी विश्वनाथ भोसले यांची निवड.. -

सोलापूर जिल्हा गटसचिवांची सह.पतसंस्थेच्या चेअरमनपदी बबनराव मेहेर तर व्हा.चेअरमनपदी विश्वनाथ भोसले यांची निवड..

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : सोलापूर जिल्हा गटसचिवांची सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी करमाळ्याचे बबनराव मेहेर, व्हा .चेअरमन पदी अक्कलकोटचे विश्वनाथ भोसले यांची बिनविरोध निवड पार पडली.

सोलापूर जिल्हा गटसचिवांच्या पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणुक नुकतीच बिनविरोध पार पडली होती . निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री ढोणे यांनी काम पाहीले श्री. ढोणे यांच्या अध्यक्षतेखाली सोलापुर येथील पतसंस्थेच्या मुख्यालयात अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची बैठक पार पडली.

यावेळी मेहेर व भोसले यांचे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी एकेकच अर्ज आल्याने त्यांची अविरोध निवड जाहीर करण्यात आली . यावेळी पतसंस्थेचे नूतन संचालक विजयकुमार भांड, दिलीप सावंत, विठ्ठल एकतपूरे, युवराज मुंडे, अण्णासाहेब शिंदे, विलास झांबरे, दिलीप नलवडे, तानाजी वाघमोडे, नागनाथ नागेशी, नवनाथ पाटोळे, आण्णा बाबर, रघुनाथ शिंदे, मीना पवार, सुरेखा थिटे आदी उपस्थित होते . निवडीनंतर मेहेर व भोसले यांचे आमदार राजेंद्र राऊत, माजी आमदार जयवंतराव जगताप, आमदार संजयमामा शिंदे,जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड , डीसीसी बॅकेचे प्रशासक कुंदन भोळे यांनी अभिनंदन केले . यावेळी गटसचिव संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग व्यवहारे, उपाध्यक्ष दिवसे भाऊसाहेब, पतसंस्थेचे माजी अध्यक्ष दत्तप्रसाद पाटील, मोहनराव देशमुख, नारायण गुंड, महादेव घाडगे, कदम भाऊसाहेब आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!