गोमांस विक्री करणाऱ्यांना रंगेहाथ पकडले – ५८ हजार रूपयाचा ऐवज जप्त
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : मौलालीमाळावर गोमांस कट करून विक्री करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या तिघा जणांना पोलीसांनी रंगेहाथ पकडले आहे. हा प्रकार १९ जुनला दुपारी पावणेएक वाजता घडला आहे. यावेळी पोलीसांनी ५८ हजार १०० रूपयाचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार मंगेश पवार यांनी फिर्याद दिली आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे, की बातमीदारा मार्फत करमाळा शहरात गोमांस विक्रीसाठीकापले जात असल्याची माहिती समजली. त्यानंतर आम्ही मौलालीमाळावर गेलो असता तेथे मुक्तादीर उर्फ बबलू कुरेशी (रा.श्रीगोंदा), अलपेज महंमद कुरेशी (रा. मौलालीमाळ करमाळा), शोएब कुरेशी (करमाळा) हे मांस कट करत असल्याचे दिसून आले.
त्यावेळी त्यांनी जर्सी गायीची कुर्बानी करता कट केले असल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांचेकडे ५७ हजार ६०० रूपयाचे २८८ किलो गोमांस आढळून आले. तसेच ५०० रूपयाचे सत्तूर व सुरे असा एकूण ५८ हजार १०० रूपयाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माहुरकर हे करत आहेत.