रावगाव येथे विविध ठिकाणी भारतरत्न डॉ. आंबेडकर यांना अभिवादन…

करमाळा / संदेश प्रतिनिधी : रावगाव (ता.करमाळा) येथे राजीव गांधी सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गावचे प्रथम नागरिक तथा सरपंच संदीप शेळके व ग्रामसेवक हजारे भाऊसाहेब यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील लिखित असणाऱ्या बहुसंख्य ग्रंथाचे प्रदर्शन ग्रंथालयात भरविण्यात आले.

तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रावगाव येथे प्रतिमा पूजन करण्यात आले, यावेळी संस्कृती जौजाळ व पायल जौजाळ यांनी आपले मनोगत व्यक्त करून अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांची भूमिका बजावली त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय येथे मेजर शहाजी ओहोळ तसेच ग्रामपंचायत सदस्य सुभाष पवार यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे समाजसेवा मंडळ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच संदीप शेळके व ज्येष्ठ नागरिक सुखदेव पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब पवार सुभाष पवार,अशोक बरडे संतोष फुंदे,अशोक पवार सर,दत्तात्रय पवार ,ज्ञानेश्वर पवार, दादासाहेब ओहोळ ,माजी पंचायत समिती सदस्य विलास मुळे, राजीव गांधी वाचनालयाचे सचिव भास्कर पवार, मानव विकास प्रतिष्ठानचे रामदास कांबळे, दिलीप पवार, समता परिषदेचे अध्यक्ष प्रशांत शिंदे, उमाकांत केकान ,बाजीराव पवार, ऋषिकेश मोरे ,सचिन जौजाळ, महावीर कांबळे, ओंकार कांबळे, विनोद बर्डे, बाबुराव पाटील, रावसाहेब जाधव, संजय मोरे, कल्याण ओहोळ मुख्याध्यापक बबन पाटोळे, महेंद्र शिंदे,प्रताप राऊत, मुनिर शेख,आदी मान्यवर उपस्थित होते.


