भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक स्तरावरील ज्ञानाचे प्रतीक : शरद पवार
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान हे जागतिक पातळीवरील सर्वात मोठे लोकशाही संविधान आहे, असे मत मातंग एकता आंदोलनाचे करमाळा तालुका अध्यक्ष शरद भैय्या पवार यांनी व्यक्त केले.
रावगाव (ता.करमाळा) येथील राजीव गांधी सार्वजनिक वाचनालयात आयोजित केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते, पुढे बोलताना ते म्हणाले की, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान हे जगाला तारू शकते नको राजे शाही नको ठोकशाही संविधानाने दिली लोकशाही असे त्यांनी म्हटले आहे.
यावेळी संविधान दिनानिमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण त्यांच्या हस्ते करण्यात आले, या कार्यक्रम प्रसंगी वाचनालयाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील आधारित ग्रंथांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या कार्यक्रम प्रसंगी महेंद्र शिंदे, मधुकर पवार ,राऊत गुरुजी, वैशाली महाजन ,प्रिया वीर, विद्या गंभीर, निर्मला पाटोळे ,चव्हाण मॅडम राहूल पवार, प्रकाश कांबळे, आल्हाट व शालेय विद्यार्थी आदी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार सचिव भास्कर पवार यांनी मानले.