केतुर येथील 'दत्तकला' व्यावसायिक महाविद्यालयास केंद्र व राज्य शासनाची मान्यता.. - Saptahik Sandesh

केतुर येथील ‘दत्तकला’ व्यावसायिक महाविद्यालयास केंद्र व राज्य शासनाची मान्यता..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : केत्तुर (ता.करमाळा) येथील दत्तकला शिक्षण संस्थेच्या दत्तकला इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी महाविद्यालया मध्ये डी.फार्मसी पदवीका अभ्यासक्रम सुरू करण्यास फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया( PCI), नवी दिल्ली व राज्य शासनाने मान्यता दिली असून हे महाविद्यालय करमाळा तालुका व परिसरातील व्यावसायिक अभ्यासक्रमांचे संकुल चालू करणारे हे पहिलेच महाविद्यालय आहे.

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्यावतीने याबाबतचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ,मुंबई या मंडळाशी दत्तकला शिक्षण संस्थेचे दत्तकला इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी हे महाविद्यालय संलग्नित आहे. हा पदवीका अभ्यासक्रम (D.pharmacy) सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून कायमस्वरूपी विनाअनुदान तत्त्वावर सुरू करण्यास केंद्र व राज्य शासनाने मान्यता दिली आहे.

करमाळा तालुक्यातील विद्यार्थ्याना इतर तालुक्यात किंवा जिल्हात व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शिक्षणाच्या प्रवेशासाठी जावे लागत असे,त्यासाठी विद्यार्थ्याना ह्या संकुलाच्या माध्यमातून ती अडचण दूर करून ही सोय ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना करून देण्यात आली आहे. असे दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.रामदास झोळ,संस्थेचे उपाध्यक्ष राणा सूर्यवंशी, संस्थेच्या सचिव सौ.माया झोळ यांनी सांगितले.

सदर पदवीका अभ्यासक्रमाची (D.pharmacy) प्रवेश प्रक्रिया व शुल्क निश्चिती आणि शिक्षण विषयक कार्यप्रणाली यांचे सनियंत्रण करण्याचे अधिकार महाराष्ट्र शासनाचे तंत्रशिक्षण संचलनालय यांना राहणार आहेत, शैक्षणिक वर्ष 2022- 23 ची प्रवेश प्रक्रिया चालू झालेली असून,या अभ्याक्रमास प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांनी संस्थेशी संपर्क साधावा व प्रवेशासाठी महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतील तंत्रशिक्षण संचालनाच्या www.dte.org.in या संकेतस्थळावर भेट द्यावी,असे आवाहन संस्थेच्या सचिव सौ.माया झोळ यांनी केले आहे.

डी.फार्मसी हा अभ्यासक्रम सुरू करणारे दत्तकला इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी हे परिसरातील व तालुक्यातील पहिलेच महाविद्यालय आहे .या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागात फार्मसी मध्ये पदविका प्राप्त करण्याची संधी तालुक्यातील विद्यार्थ्यांना प्राप्त होणार आहे.

ह्या पदवीका अभ्यासक्रमाला मान्यता मिळाल्यामुळे हे एक नवीन दालन विद्यार्थ्यांसाठी खुले होणार आहे, दत्तकलाच्या अत्याधुनिक सोयी सुविधांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाणार आहे. सदर महाविद्यालयात ये-जा करण्यासाठी बसची सोय देखील उपलब्ध आहे.त्यामुळे याचा लाभ तालुक्यातील विद्यार्थ्यानी घ्यावा. या महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना स्वतःचे औषधाचे दुकान तसेच विविध औषध निर्माण कंपन्यांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे,त्याचप्रमाणे या संकुलाप्रमाने करमाळा तालुक्यामध्ये अधिकाधिक व्यावसायिक व कौशल्य अभ्यासक्रमांची महाविद्यालय उभारण्यात येथील व त्यामाध्यमातून विद्यार्थ्याना शिक्षणाची संधी उपलब्ध करून रोजगार मिळेल व तालुक्यात असेच अनेक शैक्षणिक व समाजोपयोगी कामे केली जातील असे प्रा.रामदास झोळ यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!