शेतातील पिकाच्या कारणावरून दीराकडून भावजयीस मारहाण..

करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : शेतातील भुईमुगाचे पीक काढत असताना हे पीक माझे आहे, तुम्ही न्यायचे नाही.. असे म्हणून दीराने भावजयीस दगडाने मारहाण केली आहे. हा प्रकार ६ एप्रिलला दुपारी दोन वाजता हुलगेवाडी, ता. करमाळा येथे घडला आहे.
यात वंदना बाळासाहेब वाघमारे (रा. हुलगेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की ६ एप्रिलला मी, माझे पती व सासू आम्ही भुईमूगाचे पीक काढून त्याच्या शेंगा तोडत होतो. त्यावेळी माझे दीर मोहन सखाराम वाघमारे (रा. हुलगेवाडी) हे तेथे आले व आम्ही तोडलेल्या शेंगा पोत्यात भरू लागले. त्यावेळी सदरच्या शेंगा आमच्या आहेत तुम्ही कसे भरता.. असे म्हटल्यावर माझ्या दीराने मला दगडाने मारहाण करून जखमी केले आहे. माझी सासू सोडविण्यास आली असता तिलाही ढकलून दिले आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.


