करमाळा येथे गणेश (भाऊ) चिवटे आधुनिक व्यायाम शाळेचे भूमिपूजन संपन्न

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – करमाळा येथील श्रीराम प्रतिष्ठान संचलित श्री.गणेश(भाऊ) चिवटे आधुनिक व्यायाम शाळा तालीमचे करमाळा येथे आज सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा भाजपा चे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी चिवटे म्हणाले की,करमाळा परिसरातील मल्लांना या आधुनिक व्यायामशाळेचा फायदा होणार आहे. ही व्यायामशाळा म्हणजे आधुनिक क्रीडा संकुल असणार आहे.या आधुनिक अशा व्यायामशाळेत मल्लाना मॅट व लाल मातीतील कुस्ती प्रकार शिकवले जाणार आहेत. तसेच यामध्ये जिमचे साहित्य व्यायामासाठी उपलब्ध करण्यात येणार आहे.यामुळे एकाच ठिकाणी मॅट,लाल माती व जिम अशी परिपूर्ण असणारी करमाळा परिसरातील एकमेव क्रीडा संकुल असणार आहे.

यावेळी भाजपा ता. उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे,करंजेचे सरपंच काकासाहेब सरडे,शिवराज चिवटे,मोहन शिंदे,पै.सोमनाथ घाडगे,पै.बाळूभाऊ जाधव,बिटरगाचे श्री चे सरपंच डॉ. अभिजित मुरूमकर,भाजपा सोशल मीडिया संयोजक नितीन झिंजाडे,भाजपा ता. उपाध्यक्ष अजिनाथ सुरवसे,पै.सचिन गायकवाड,मकाई चे माजी संचालक धर्मराज नाळे,विशिंबे चे उपसरपंच अमोल पवार,भाजपा जि. चिटणीस विनोद महानावर,दीपक गायकवाड,पै.विलास भोसले,पै. किरण शिंदे,बालाजी जाधव,अजय शिंदे, जयसिंग भोगे आदी.उपस्थित होते.

करमाळा तालुक्याती सर्व सोईसुविधा असणाऱ्या या एकमेव अशा क्रीडा संकुलाचे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे.भाजपा चे जिल्हा सरचिटणीस गणेश भाऊ चिवटे यांनी याकामी विशेष लक्ष घातल्यामुळे जास्तीत जास्त मल्ल घडवता येणार आहेत.

पै.अफसर जाधव, डबल महाराष्ट्र केसरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!