चिवटे यांच्या हस्ते कोंढेज येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न - Saptahik Sandesh

चिवटे यांच्या हस्ते कोंढेज येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून या समितीचे सदस्य तथा भाजपाचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या हस्ते आज (दि.८) करमाळा तालुक्यातील कोंढेज येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.

या विकास कामात कोंढेज येथील खत्री दुकान ते महादेव मंदिर (मठ )रस्ता सिमेंट काँक्रिटी करणे (३ लाख रुपये) , ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर यात्रा छबीना मार्ग रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण करणे (४ लाख रुपये) या कामांचा समावेश आहे. याचबरोबर गावकऱ्यांच्या लोक वर्गणीतून श्रीराम मंदिर बांधकामचे भूमिपूजनही श्री. चिवटे यांच्या हस्ते पार पडले.

यावेळी बोलताना गणेश चिवटे म्हणाले की, शासनाचे विकासाचे धोरण समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोचवणे हेच सत्तेचे ध्येय असते. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण हेच ध्येय एक व्रत म्हणुन काम करत आहोत. करमाळा तालुक्याच्या विकासासाठी विविध गावात पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील व माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून सोलापूर जिल्हा नियोजन मंडळातून विविध विकास कामांसाठी निधी मंजूर केला आहे असेही चिवटे यांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपा सोशल मिडीयचे माढा लोकसभा संयोजक नितीन झिंजाडे यांनी केले.
या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे, जिल्हा उपाध्यक्ष पै. अफसर जाधव, पांडुरंग बापु लोंढे व कोंढजचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!