जेऊर येथील भुयारी मार्गालगत रस्त्यावर मोठे खड्डे ; तात्काळ दुरुस्त करावे अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन : आनंदराजे मोरे

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : जेऊर (ता.करमाळा) येथील भुयारी मार्गालगत असलेल्या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडलेले आहे, ते खड्डे तात्काळ बुजवण्यात यावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल अशा इशारा मनसे विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष आनंदराजे मोरे यांनी दिला.

जेऊर येथे गेल्या वर्षभरापासुन रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत, याचा त्रास शाळकरी मुलांना तसेच वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात होत आहे. दुचाकी तसेच चारचाकी वाहने खड्यामध्ये आपटले जात असुन नागरिकांना याचा त्रास सहन करून वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच भुयारी मार्गाच्या वरील बाजुने जाणारा सर्विस रस्त्यावर दोन चाकी तसेच चार चाकी वाहने मोठ्या भरधाव वेगाने गाड्या चालवतात त्याचा त्रास शाळकरी मुलांना तसेच वयोवृद्ध नागरिकांना होत असुन तेथे गतिरोधक बसवावेत अशी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात वारंवार बांधकाम विभागाला कळवुन देखील याची दखल घेतली जात नसुन 15 दिवसात जर खड्डे बुजवले नाही तर मनसे स्टाईल ने आंदोलन करण्यात येईल अशा इशारा मनसे विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष आनंदराजे मोरे यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!